Ad will apear here
Next
मोहक युरोप + साद ऑस्ट्रेलियाची + मुशाफिरी आवडलेल्या देशांची
पर्यटनासाठी बाहेर गेल्यानंतर त्याची माहिती वाचकांपर्यंत प्रवासवर्णनातून पोहोचविण्याचे काम काही पर्यटक करतात. लता गुठे यांनी हे काम ‘मोहक युरोप’ या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. लंडन, कलेचे माहेरघर पॅरिस, ब्रुसेल्स, कालव्यांचे शहर अॅमस्टरडॅम, ऐतिहासिक रोम, व्हेनिस अशा शहरांची सफर यातून होते. ऑस्ट्रेलिया या देशाची निर्मिती, इतिहास, भूगोल कथन केल्यानंतर क्वीन्सलँडमधील गोल्ड कोस्ट, सी वर्ल्ड, केनर्स, दी ग्रेट बॅरियर रीफ, मेलबर्न, सिडनी या शहरांमधील पर्यटनस्थळांची माहिती मधुबाला पाटील यांनी ‘साद ऑस्ट्रेलियाची’ या पुस्तकामध्ये दिली आहे. ‘मुशाफिरी आवडलेल्या देशांची’ या पुस्तकामधून सुवर्णा अशोक मयेकर यांनी पाच-सहा देशांतून फिरवून आणले आहे. दक्षिण आफ्रिका, आनंदी-समाधानी देश भूतान, केनियातील जंगल सफारी, फ्रान्स, केनिया, स्वित्झर्लंड आदी देशांबरोबरच भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील लेह-लडाख, सिक्कीम आदी राज्यांची माहिती उपयुक्त आहे. 

पुस्तक : मोहक युरोप
लेखिका : लता गुठे
पुस्तक : साद ऑस्ट्रेलियाची
लेखिका : मधुबाला पाटील
पुस्तक : मुशाफिरी आवडलेल्या देशांची
लेखिका : सुवर्णा मयेकर
प्रकाशक : भरारी पब्लिकेशन्स
(एकत्रित) पृष्ठे : ४५०
(एकत्रित) मूल्य : ५०० रुपये

(मोहक युरोप, साद ऑस्ट्रेलियाची, मुशाफिरी आवडलेल्या देशांची या तीन पुस्तकांचा संच ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZQNCD
Similar Posts
पारंपरिक व्हेज ट्रीट आपल्या प्रत्येकाच्या घरात खास महाराष्ट्रीयन पद्धतीचे पदार्थ रोजच्या आहारात असतात. साधेच पण चविष्ट पदार्थ खाल्ले की मन तृप्त होते. शाकाहारी जेवणातील मराठमोळ्या चवदार पदार्थांच्या कृती माधुरी घाटपांडे यांनी ‘पारंपरिक व्हेज ट्रीट’मधून दिल्या आहेत.
तेजोमय भारतात प्राचीन काळापासून अनेक तत्त्ववेत्ते होऊन गेले. जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या तत्त्ववेत्त्यांपैकी गौतम बुद्ध, चार्वाक, कबीर, मीराबाई, महर्षी योगी अरविंद, जे. कृष्णमूर्ती, विवेकानंद आणि ओशो अशा आठ तत्त्ववेत्त्यांची ओळख माधवी कुंटे यांनी ‘तेजोमय’मधून करून दिली आहे.
‘जगण्याच्या आरपार’ कवितासंग्रहाचे प्रकाशन मुंबई : लता गुठे लिखित 'जगण्याच्या आरपार' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ सहित्यिका डॉ. विजया वाड आणि कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गुठे यांच्या 'मोहक युरोप' या प्रवासवर्णनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले.  विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language